अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामासाठी देवेंद्र फडणवीस यांची 1 लाख 1 रुपयांची देणगी


वृत्तसंस्था

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 1 लाख 1 रुपयांची देणगी मुंबईत दिली. श्री राममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी यांच्याकडे ही देणगी त्यांनी कुटुंबियासमवेत दिली. Devendra Fadnavis one lakh one donation for construction of Ram temple in Ayodhya

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी 15 जानेवारीपासून निधी समर्पण अभियान भाजपने सुरु केले होते. त्या पूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत साकारले जातेय, ही आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीच! या राष्ट्रीय कार्यात एक कारसेवक म्हणून आज माझा खारीचा वाटा स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांच्याकडे समर्पित करता आला,हे माझे भाग्य! सर्वांनी मंदिरासाठी निधी द्यावा, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

Devendra Fadnavis one lakh one donation for construction of Ram temple in Ayodhya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था