देवेंद्र फडणवीस म्हणतात आणिबाणीची मानसिकता, तर अमृता फडणवीस यांंनी सादर केला शेर


रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक ही आणिबाणीची मानसिकता कायम असल्याचे दर्शविणारी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर एक शेर ट्विट करून अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा दिला आहे. बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा! असे त्यांनी म्हटले आहे.(devendra fadnavis news)


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक ही आणिबाणीची मानसिकता कायम असल्याचे दर्शविणारी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर एक शेर ट्विट करून अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा दिला आहे. बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा! असे त्यांनी म्हटले आहे.devendra fadnavis news

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे म्हणाले की, सरकार आणि सत्ताधारी पक्षांविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. या घटना आणीबाणीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत. ज्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद केला होता, त्याचा तपास पालघर येथे साधूंच्या हत्येवरून सरकारवर टीका केल्यामुळे पुन्हा सुरु केला गेला.

devendra fadnavis news

पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येबाबत आघाडी सरकारला जाब विचारल्यानेच अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. गोस्वामी हे दोषी असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हायला हवी. मात्र पहाटे पाचला जाऊन त्यांना अटक केली गेली. यावरूनच हे सरकार सूडबुद्धीने काम करीत असल्याचे सिद्ध होत आहे.

तावडे म्हणाले की, सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांबद्दल समाज माध्यमातून मतप्रदर्शन करणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरी जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. एका मंत्र्याबद्दल टिप्पणी केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन तरुणाला मारहाण केली गेली, या सर्व घटना आणीबाणीत झालेल्या अत्याचाराचे, दडपशाहीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती