Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar in Press Conference at nagpur

फडणवीसांनी फाडला महाविकास आघाडीचा बुरखा, म्हणाले- पवारांनी सांगितले अर्धसत्य; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच वाझे पुन्हा नोकरीत!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाले आहे. (Devendra Fadnavis Press at Nagpur) गृहमंत्र्यांवर वाझेंकरवी 100 कोटी दरमहा हप्ते वसुलीचा घाट घातल्याचा आरोप परमबीर यांनी आपल्या पत्रातून केला आहे. याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची सविस्तर उकल माध्यमांसमोर केली.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाले आहे. गृहमंत्र्यांवर वाझेंकरवी 100 कोटी दरमहा हप्ते वसुलीचा घाट घातल्याचा आरोप परमबीर यांनी आपल्या पत्रातून केला आहे. (Devendra Fadnavis Press at Nagpur) याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची सविस्तर उकल माध्यमांसमोर केली.

यापूर्वी सुबोध जायस्वालांनीही लिहिले होते असे पत्र

फडणवीस म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलीस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते.

फडणवीस पुढे म्हणाले की, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते या भ्रष्ट कारभाराला कंटाळून केंद्रात गेले. ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे.

शरद पवारांनी सांगितले अर्धसत्य

सचिन वाझे यांना पुन्हा नोकरी बहाल होण्याच्या प्रसंगावर देवेंद्र फडणवीस प्रकाश टाकत म्हणाले की, परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले; परंतु मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले. परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रीफिंग) सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत? परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय चौकशी होणार कशी?

फडणवीस म्हणाले की, गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, त्यांची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरे अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे. सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.

ज्युलिओ रिबेरो गृहमंत्र्यांची चौकशी करणार का?

पुढील कारवाईबाबत भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. पण, शरद पवार यांनी सुचवल्याप्रमाणे ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांचीसुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सुचवायचे आहे का?

अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असे सांगून देवेंद्र फडणवीसांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत झाली पाहिजे. गृहमंत्र्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, ही आपली भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडी सरकारच्या एकूण कारभारावरच देवेंद्र फडणवीसांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, सरकारचे कसे आहे… आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू. फक्त विरोधक बोलले की राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. अशा वाक्यांची आता आम्हाला सवय आहे. त्याने फार काही फरक पडत नाही!

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*