बिल्डरांना डोळ्यापुढे ठेऊनच प्रीमियमवर ५० टक्के सूट, देवेंद्र फडणवीस यांची टीका

बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय हा केवळ बिल्डरांना डोळ्यांपुढे ठेवून घेण्यात आला असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis criticizes 50 per cent discount on premium keeping builders in mind


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय हा केवळ बिल्डरांना डोळ्यांपुढे ठेवून घेण्यात आला असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने आज जो निर्णय घेतला, त्यामुळे केवळ काही बिल्डरांनाच मोठा फायदा होणार आहे. कुठलीही सवलत द्यायला आमचा नकार नाही. कोरोनानंतरच्या काळात काही सवलती दिल्याही पाहिजेत. पण ज्या पद्धतीने या सवलत देण्यात आली, त्याचे फायदे केवळ काही विकासकांना होणार आहेत.आम्ही जे आक्षेप नोंदविले होते, त्यावर त्यांनी एक निर्णय केला की, ज्या वर्षीचे दर अधिक असतील, तो आधार मानण्यात येईल. पण दुसरा जो निर्णय स्टँप ड्युटी बिल्डरने देण्यासंदर्भात केला, त्याचा फारसा लाभ होणार नाही. कारण बिल्डरला मिळणारा फायदा आणि त्याला द्यावी लागणारी स्टँप ड्युटी यात फार मोठे अंतर आहे.
प्रीमियम कमी करायचे असतील आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष जनतेला द्यायचा असेल तर यासाठी रेराच्या यंत्रणेचा उपयोग करायला हवा आणि त्यांच्या माध्यमातून हा फायदा प्रत्यक्ष ग्राहकाला मिळतोय, हे सुनिश्चित केले पाहिजे. पण सरकारने तसे न केल्याने या निर्णयाचा फायदा केवळ विकासकाला होईल. त्यातही काही लोकांना तर फारच मोठा फायदा होईल. पण ग्राहकांना फायदा होणार नाही. यासंदर्भात आम्हाला अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्यासंदर्भात मी आताच काही बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

पूर्ण माहिती प्राप्त होताच पुन्हा त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, यातील घोटाळा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. या संपूर्ण प्रकरणात जो अर्थपूर्ण व्यवहार झालेला आहे, ती चर्चा व्यथित करणारी आहे.

Devendra Fadnavis criticizes 50 per cent discount on premium keeping builders in mind

बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी प्रिमियममध्ये हजारो कोटींची सूट विकासकांंना दिली तरी सामान्य माणसाला घरांच्या किंमती कमी होतील का? असा सवाल भाजपा नेते आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी केला आहे. सामान्य माणसाला फायदा होणार का? याबाबत कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*