सगळी मिलीजुली सरकार, राठोडांवर नेते नाराज असल्याच्या बातम्या पेरलेल्या, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

महाआघाडी सरकार म्हणजे पूर्ण मिलीजुली सरकार आहे. राठोड यांच्यावर मोठे नेते नाराज असल्याच्या केवळ बातम्या पेरल्या जात आहेत. तसं असतं तर राठोड प्रकरणात कारवाई झाली असती, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis alleges that the news about leaders are angry with Rathore is sown


प्रतिनिधी

मुंबई: सगळी मिलीजुली सरकार आहे. राठोड यांच्यावर मोठे नेते नाराज असल्याच्या केवळ बातम्या पेरल्या जात आहेत. तसं असतं तर राठोड प्रकरणात कारवाई झाली असती,’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीवर सरकारवर आरोप करताना फडणवीस म्हणाले, इतके भक्कम पुरावे फार कमी प्रकरणांमध्ये असतात. मात्र, पोलिसांनी अद्याप साधी चौकशी केलेली नाही. गुन्हा दाखल करून घेतलेला नाही.कायद्याचं राज्य आहे कुठे? शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज वगैरे काही नाहीत. केवळ बातम्या सोडल्या जातात. नाराजी असती तर आतापर्यंत कारवाई झाली असती. सगळी मिलीजुली सरकार आहे. हे सगळं आशीवार्दानंच सुरू आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर बोलत नाहीत. काय तपास झाला हे सांगत नाहीत. पोलिसांना काहीही विचारत नाहीत. ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे विचारत नाहीत. हे सगळं आश्चर्यकारक आहे

Devendra Fadnavis alleges that the news about leaders are angry with Rathore is sown

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*