सडक्या मेंदूचा शरजील हिंदूंना सडका म्हणतो, हिंदू रस्त्यावर पडलाय काय; महाराष्ट्रात मोगलाई आहे काय?; ठाकरे सरकारवर फडणवीसांचे प्रश्नचिन्ह

विशेष प्रतिनिधी

पुणे : “शरजील उस्मानी नावाचा सडक्या डोक्याचा व्यक्ती पुण्यात येऊन एल्गार परिषदेत, हिंदुंना सडकं म्हणतो आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का? या सरकारला शरम वाटायला पाहिजे.” अशा कठोर शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला सटकावले.devendra fadanvis targets thackeray – pawar govt over sharjeel usmani and elgar parishad issue

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने हिंदू समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर तोफ डागली. फडणवीस म्हणाले, “गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करू. कशाची चौकशी करता? सगळीकडे त्याचा स्पष्ट व्हिडिओ दिसतो आहे.

सगळीकडे व्हायरल होतो आहे. आणि महाराष्ट्रात कुणी येऊन हिंदुंना सडकं म्हणणार असेल आणि ठाकरे – पवार सरकार ते ऐकून घेणार असेल, तर भाजपा गप्प बसणार नाही. तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून, जर त्याला अटक केली नाही. तर, त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू करू.”

फडणवीस म्हणाले की, “हा तोच व्यक्ती आहे जो बाहेर येऊन म्हणतो, की आम्ही बाबरी मशीद पुन्हा बांधू. अशा सडक्या डोक्याच्या लोकांना या महाराष्ट्रात का प्रवेश देता? प्रवेश दिला तरी त्यांना कार्यक्रम का करू देता? येथे तर आपल्याला कल्पना होती. एल्गार परिषद केवळ आग ओतण्यासाठी आणि समाजात तेढ आणण्यासाठी तयार झालेली आहे आणि तेच त्याचं काम आहे. हा अनुभव असताना देखील, त्यांना अशाप्रकारे आयोजन केले जाऊ दिले जाते. यात कुठंतरी ठाकरे – पवार सरकारची मिलीभगत आहे.”

“हिंदुंच्या विरोधात इतके अनर्गल बोलले जाते ते सरकारच्या मर्जीनंच आहे, असेच आम्हाला वाटते. तत्काळ शरजीलवर कारवाई झालीच पाहिजे. “शिवसेना सत्तेला मिंधी झाली आहे. ते सत्तेपुढे झुकले आहेत. त्यामुळे ते यासंदर्भात बोलूच शकत नाही.” अशा शब्दांत फडणवीसांनी शिवसेनेवर कोरडे ओढले.

devendra fadanvis targets thackeray – pawar govt over sharjeel usmani and elgar parishad issue

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*