प्रतिनिधी
मुंबई : नागपूर – हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी नाही, असे म्हणत भाजपला टोला हाणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच जोरात प्रतिटोला हाणला आहे. बरोबरच आहे, हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. पण हिंदुत्व जगावे लागते.नुसते भाषणातून बोलून चालत नाही, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.devendra fadanvis takes a dig at uddhav thackeray over hindutva issue
फडणवीस म्हणाले, की ज्यावेळी “हिंदूह्रदयसम्राट” बाळासाहेब ठाकरे हे “जनाब” बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होऊन अजान स्पर्धा सुरू होते तेव्हाच अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागते.
म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी नसल्याचे वक्तव्य केले असावे. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडून दिले एवढेच सांगावे,” असे आव्हानही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. शिवसेनेने मोर्च्यांच नौटंकी न करता जे आम्ही केले होते ते करून दाखवावे, असे आव्हानही फडणवीसांनी ठाकरेंना दिले.
–सेलिब्रिटी ट्विटर वॉरवर भाष्य
“कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरु आहे हे काल उघड झाले. शेतकरी आंदोलनाचा फायदा घेऊन भारताला बदनाम करायचे, भारतात अराजक निर्माण करायचे यासंदर्भातील कारस्थान बाहेर आले आहे.
वेगवेगळ्या देशातील नेत्यांना यामध्ये आणून या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा भास देऊन भारताला बदनाम करायचे हे कारस्थान कालच्या ट्विटमुळे उघड पडले आहे, असे फडणवीस म्हणालेत.