Devendra Fadanvis On Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी खोलला वाझे प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा, म्हणाले- वाझेंच्या राजकीय हँडलरचा शोध महत्त्वाचा!

Devendra Fadanvis On Vaze Case Slams Thackeray Government, says finding of Vaze's political handler is Most important

(Devendra Fadanvis On Vaze Case) मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, हे पुरेसे नाही. सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही छोटी माणसं आहेत, त्यांच्यामागील बड्या राजकीय हँडलरचा चेहरा उघड झाला पाहिजे. सचिन वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. पण हे चालणार नाही. या दोघांचे राजकीय मालक समोर आणावे लागतील. Devendra Fadanvis On Vaze Case Slams Thackeray Government, says finding of Vaze’s political handler is Most important


विशेष प्रतिनिधी

मुंबई : (Devendra Fadanvis On Vaze Case) मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, हे पुरेसे नाही. सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही छोटी माणसं आहेत, त्यांच्यामागील बड्या राजकीय हँडलरचा चेहरा उघड झाला पाहिजे. सचिन वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. पण हे चालणार नाही. या दोघांचे राजकीय मालक समोर आणावे लागतील.

एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत पुन्हा का घेण्यात आलं, असा सवाल त्यांनी केला. वाझेंना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते आणि 2007 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतला. तपास सुरू असल्याने व्हीआरएस स्वीकारला गेला नाही. 2018 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून मला सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे, अशी सूचना मिळाली. तेव्हा मी अ‍ॅडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला. त्यांना सेवेत घेऊन हायकोर्टाचा अपमान होईल या मताच्या आधारे मी त्यांना सेवेत पुन्हा नियुक्त केले नाही. पण जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा कोरोना काळातील अधिकाऱ्यांची गरज सांगून सचिन वाझे यांची सेवा पूर्ववत झाली. परंतु सचिन वाझे सोडून इतर अधिकाऱ्यांना पुन्हा घेण्यात आले नाही.

‘शिवसेनेने सचिन वाझेंना सातत्याने प्रमोट केले’

2017 मध्ये खंडणीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतल्याचे वाझेंचे एक प्रकरण होते. एवढे खराब रेकॉर्ड असूनही त्यांना पुन्हा सेवेत आणले गेले. एवढेच नव्हे तर त्यांना गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाचे प्रमुख बनविण्यात आले. सर्व महत्त्वाचे तपास त्यांना देण्यात आले. हृतिक रोशन आणि कंगना रनौतचे प्रकरण असो किंवा रॅपर बादशाहचे प्रकरण असो. असे दिसते की, मुंबईच्या आयुक्तांनंतर पोलीस खात्यात कोणी मोठा असेल तर ते हेच होते. ते सर्वत्र दिसून येत होते. मग ते पोलीस विभागाचे ब्रीफिंग असो किंवा शिवसेनेची बैठक. म्हणजे ते या लोकांसाठी खंडणी गोळा करायचे काम करत होते.

‘हिरेन यांनी सचिन वाझेंचा सल्ला मानून जीव गमावला’

मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे यांनी खरेदी केली, पण पैसे दिले नाहीत. जेव्हा मनसुख हिरेन म्हणाला की, एकतर गाडी परत करावी की पैसे द्यावेत. यावर सचिन वाझे म्हणाले की, त्यांना काही दिवस ठेवून गाडी परत दिली जाईल. यानंतर गाडी चोरी झाली नाही. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांना सांगितले की, त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार द्यावी. कोणीही त्यांची तक्रार नोंदवत नव्हता. यावर सचिन वाझे यांनी पोलीस ठाण्यात फोन केला व वाझे यांनीच गुन्हा नोंदवण्यास सांगितले.

‘वाझेंनीच हिरेन यांना मुख्यमंत्री- गृहमंत्र्यांना पत्र लिहायला लावले’

स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर पुढील तीन दिवस फक्त सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेनची चौकशी केली. यानंतर जेव्हा सचिन वाझे यांना असे वाटले की, अन्य पोलीस अधिकाऱ्यांकडूनही मनसुखची चौकशी केली जाऊ शकते, तेव्हा सचिन वाझे यांनीच मनसुख यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तक्रारीचे पत्र लिहायला लावले. या पत्रात वारंवार चौकशीमुळे आपण त्रस्त असल्याचे मनसुख यांनी लिहिले होते.‘मनसुख जेथे ठार झाले, त्या जागेशी वाझेंचा 2017चा संबंध’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, त्यानंतर मनसुखला सचिन वाझेंनी अशा ठिकाणी बोलावले, जेथे 2017 मध्ये खंडणी प्रकरणात त्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली होती. सचिन वाझे यांना 2017च्या खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता. धनंजय गावडे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच धनंजय गावडे यांच्या घराजवळ मनसुखचे अखेरचे लोकेशन सापडली आहे. येथे त्यांना मारण्यात आले आणि नंतर त्यांना खाडीत फेकण्यात आले. शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की, बुडण्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही, कारण त्यांच्या फुप्फुसांत जास्त पाणी नाही. याचा अर्थ असा की त्यांची हत्या झाली आणि नंतर त्यांचा मृतदेह मुंब्राच्या खाडीत टाकण्यात आला.

मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयएने करावा

देवेंद्र फडणवीस यांनी अखेर म्हटले की, आमची मागणी अशी आहे की, मनसुख हिरेन प्रकरणही अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याशी संबंधित आहे, एनआयएनेही या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. कारण या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे.

Devendra Fadanvis On Vaze Case Slams Thackeray Government, says finding of Vaze’s political handler is Most important

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती