कृषी कायद्यांवर ठाकरे – पवार सरकारचे ढोंग उघड; महाराष्ट्रात आधीच कायदे लागू, आता मोर्चे काढताहेत; फडणवीसांचे टीकास्त्र


विशेष प्रतिनिधी

भंडारा : मूळात कृषी जे कायदे सर्वांत आधी महाराष्ट्राने केले, तेच कृषी कायदे आता देशात झाले, तर हे ठाकरे – पवार सरकार ढोंगीपणा करतेय. पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना या सरकारने एकूण फक्त 11 कोटी रूपये दिले. आज कित्येक शेतकरी अर्ज करून हैराण आहेत, पण त्यांना कोणतीही मदत देत नाहीत. हेच बांधावर जाऊन आश्वासने देणारे आज शेतकर्‍यांना कवडीची मदत करीत नाहीत, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यातील भव्य शेतकरी मोर्चात केली. devendra fadanvis comes down heavily on thackeray – pawar govt over farm laws



शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि भंडाऱ्यातील अग्निकांडात मृत बालकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकरांना संबोधित केले. त्यावेळी ठाकरे – पवार सरकारला धारेवर धरले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…

  • राज्यातील ठाकरे – पवार सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा. या सरकारने अनेक योजनांना स्थगिती दिली. केवळ एकच योजना सुरू आहे, ती म्हणजे भ्रष्टाचार.
  • पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना या सरकारने एकूण 11 कोटी रूपये दिले. आज कित्येक शेतकरी अर्ज करून हैराण आहेत, पण त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. हे बांधावर जाऊन आश्वासने देणारे सरकार आज शेतकर्‍यांना कवडीची मदत करीत नाही.
  • भाजप सरकारच्या काळात दुधाला अनुदान दिले गेले. पण, आज दुधाचे पैसेच दिले जात नाही.
  • वीजबिल माफीची घोषणा तर सरकारच्या मंत्र्यांनीच केली. पण, आज ते घूमजाव करतात. गरिबांना देण्यासाठी 1200 कोटी नाहीत आणि मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सवलत, वारे सरकार.
  • वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी गावात कुणी आले तर त्याला एक गुलाबाचे फूल द्या आणि त्यांना गाडीत बसवून परत पाठवा. कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची.
  • 10 बालकांच्या मातांचे अश्रू अजूनही सुकले नाहीत. भंडार्‍यातून घालवता आणि वर्ध्यात रूजू करून घेता, हीच का तुमची संवेदनशीलता?
  • 6 महिने मंत्रालयात फाईलवर बसून राहिले नसते, तर आज ही वेळ आली नसती. हा अपघात नाही, राज्य सरकारच्या चुकीमुळे हे मृत्यू. बेईमानीने आलेल्या सरकारचा मुकाबला रस्त्यावर करावा लागेल.
  • जे कृषी कायदे सर्वांत आधी महाराष्ट्राने केले, तेच कृषी कायदे आता देशात झाले, तर हे ठाकरे – पवार सरकार आणि डावे पक्ष ढोंगीपणा करताहेत.

devendra fadanvis comes down heavily on thackeray – pawar govt over farm laws

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती