संघाच्या व्यापक उपक्रमांमधून देशाचा सर्वांगीण विकास शक्य – सरसंघचालक


विशेष प्रतिनिधी

पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा उपक्रम एवढे व्यापक असून त्याद्वारे समाजाच्या आचरणात बदल घडवून आणता येऊ शकतो. या बदलांद्वारे देशाचा सर्वांगीण विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. सध्या सरसंघचालक गोवा दोऱ्यावर असून शुक्रवार, २९ जानेवारी रोजी त्यांनी संघाच्या सहा उपक्रमांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. development of the country is possible activities of the Sangh Sarsanghchalak

कार्याच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षण, समरसता, गोसेवा, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, धर्मजागरण असे वेगवेगळे सहा उपक्रम संघाने गतिविधी अंतर्गत तयार केले आहेत. या गतिविधींच्या अंतर्गत विविध उपक्रम कोकण प्रांतात चालविले जातात. या उपक्रमांचा आढावा घेत सरसंघचालकांनी कार्यकर्त्यांना कार्य अधिक समाजोपयोगी व्हावे या दृष्टीने काही सूचना केल्या. विश्व संवाद केंद्राने ही माहिती दिली आहे.पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सरसंघचालकांनी हरित घर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने वृक्षारोपण करावे, पाण्याची-ऊर्जेची बचत करावी, ओल्या कचऱ्यापासून घरातच कंपोस्ट खत तयार करावे, घरात छोटे पक्षीघर असावे. या हरित घर संकल्पनेचा विस्तार पर्यावरण संरक्षण गतिविधी अंतर्गत विस्तार केला जावा असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घरोघरी एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकचा साठा होऊ नये यासाठी इको ब्रीक्सचा वाढता वापर याबाबत प्रचार केला जावा असेही ते म्हणाले. पर्यावरण गतिविधी अंतर्गत पाणी वाचवा, झाडे लावा आणि प्लास्टिक कमी वापरा या तीन मुद्द्यांच्या अंतर्गत अधिकाधिक कार्यविस्तार व्हावा असेही त्यांनी सूचित केले.

समरसता उपक्रमाचा आढावा घेताना त्यांनी त्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. भेदभावमुक्त समाजरचना तयार करणे, विषमता पसरविणाऱ्या घटना थांबविण्यासाठी प्रयत्न करणे, विविध महापुरुषांचे जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन साजरे करणे, त्यासाठी समाजमानस तयार करणे, आपल्या आचरणात योग्य ते बदल करणे आणि भेदभावरहित कुटुंबरचना उभी करण्यास प्रयत्नशील राहणे या उद्दिष्टांना उपयोगी ठरतील अशा उपक्रमांचे आयोजन गतिविधी अंतर्गत केले जावे असे ते म्हणाले.

ग्रामविकास गतिविधी अंतर्गत कोकण प्रांतातील ७१ गावांतील १३६२ कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सरसंघचालक म्हणाले की, जल, जंगल, जमीन, जन, ऊर्जा, जीव आणि गोविकास या सप्तसंपदेवर शाश्वत ग्रामविकास करणे आवश्यक आहे.

कुटुंब प्रबोधन गतिविधीचा आढावा घेताना २७ जिल्ह्यांतील ६६६ शेतकऱ्यांना गो आधारित शेती अर्थात जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समजले. एकूण १३५ कार्यकर्ते या उपक्रमासाठी कोकण प्रांतात कार्यरत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात एक तरी देशी गाय असावी, असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. दीपावलीच्या काळात ४१ गोपालक शेतकरी परिवारांनी १,०२,७७६ गोमय दिवे तयार केले होते. प्रत्येक घरात देशी गाय असावी या उद्दिष्टाप्रमाणेच प्रत्येत घरात देशी गायीचे दूध व तूप पोहोचले पाहिजे यासाठीही सर्वांनी प्रयत्नशील असावे असे सरसंघचालकांनी सांगितले.

३१ तारखेपर्यत सरसंघचालक गोव्याच्या दौऱ्यावर असून उर्वरीत दोन दिवसात ते गोव्यातील कार्यकर्त्यांशी तसेच विविध मान्यवरांशी ते या दौऱ्यात संवाद साधणार आहेत.

development of the country is possible activities of the Sangh Sarsanghchalak

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती