सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणाऱ्याकडूनच नुकसान वसूल करणार , हरियाणात विधेयक मांडले; अहिंसेच्या गप्पा ठोकणाऱ्या काँग्रेसचा विरोध

वृत्तसंस्था

चंदीगड : सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणाऱ्याकडून नुकसान वसूल करण्याचे विधेयक हरियाणा विधानसभेत आज मांडले. परंतु, विरोधी पक्ष काँग्रेसने या मुद्द्यावर मतविभाजनाचा आग्रह धरला. अध्यक्षानी परवानगी दिली नाही. त्यामुळे काँग्रेसने सभात्याग केला. destroyer of public property To recover damages, bill tabled in Haryana; Opposition to non-violence Congress

गृहमंत्री अनिल वीज यांनी विधेयक मांडले. त्यावर काँग्रेसचे सदस्य आर. एस. काडीयन म्हणाले, या विधेयकाचा संबध शेतकरी आंदोलनांशी आहे का ? असे विधेयक मांडून सरकार शेतकऱ्याचा जखमेवर मीठ चोळत आहे. त्यानंतर काँग्रेसने मतविभाजनाची मागणी करून गदारोळ घेतला.तुम्ही विधेयकाला विरोध करून एकप्रकारे हिंसाचाराचे समर्थन करत आहात का, असा सवाल अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी काँग्रेसच्या गोंधळी आमदारांना विचारला. तशी विभाजनाची तरतूद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे गृहमंत्री अनिल वीज यांनी काँग्रेसच्या आरोपात तथ्य नाही. काँग्रेस दिशाभूल करत आहे, असे ते म्हणाले.

एकूणच सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणाऱ्याकडून नुकसान वसूल करण्याचे विधेयक भाजप सरकारने आणले. त्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. एकीकडे अहिंसेच्या गप्पा ठोकायच्या दुसरीकडे हिंसक आंदोलनाला प्रोत्साहन द्यायचे. ही काँग्रेसची दुटप्पी नीती या विधेयकाला विरोध केल्यामुळे अधिक उघड झाली आहे.

उत्तरप्रदेशातील आंदोलक वठणीवर : उत्तरप्रदेशातही सार्वजनिक मालमत्तेचे विध्वंस करणाऱ्याकडून नुकसान वसुली करण्याचा कायदा लागू आहे. तो मोडणाऱ्याकडून नुकसान वसूल केले जात आहे. त्यामुळे तेथील उठसुठ आंदोलन करून हिंसा करणाऱ्या मंडळीना चाप बसला आहे.

destroyer of public property To recover damages, bill tabled in Haryana; Opposition to non-violence Congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*