देशमुख – पवारांचे आणखी एक ‘ सफेद झूठ ‘ : अलेक्सिस हॉस्पिटलनेच पाडले पितळ उघडे

विशेष प्रतिनिधी 

नागपूर : दिनांक १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषेदेतून सांगितले. परंतु आता नागपूरच्या हॉस्पिटलनेच शरद पवार आणि अनिल देशमुखांचे पितळ उघडे पाडले आहे.Deshmukh: Another ‘white lie’ of Pawar: Alexis Hospital demolishes brass

नागपूरचे अलेक्सिस हॉस्पिटल जिथे देशमुख यांना ऍडमिट करण्यात आले होते, त्या हॉस्पिटलने हे स्पष्ट केले आहे की, देशमुख यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाईनबद्दल सांगण्यात आले नव्हते.

अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्विट करून असे सांगितले होते की, दिनांक ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान मला कोरोना झाला होता.

त्यामुळे मी नागपूरच्या  हॉस्पिटलमध्ये होतो. १५ तारखेला मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर बाहेर पडत असताना काही पत्रकार हॉस्पिटलच्या गेटवर उभे होते. त्यांना काही प्रश्न होते. मला थकवा असल्याने मी तिथे खुर्चीवर बसून काही प्रश्नांची उत्तरे दिली.

 

 

नंतर गाडीतून होम क्वारंटाईनसाठी निघून गेलो. त्यानंतर थेट २८ फेब्रुवारी रोजी मी सह्याद्री या महाराष्ट्र सरकारच्या गेस्ट हाऊस वर एका मिटिंगला पोहोचलो. या शब्दांत त्यांनी खुलासा केला आहे.

Deshmukh: Another ‘white lie’ of Pawar: Alexis Hospital demolishes brass

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*