सर्वात मोठा पक्ष विरोधात ही लोकशाहीची थट्टाच, पण आम्ही फासे पलटवू, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

राज्यात सर्वात कमी आमदार असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. सरकारला या पक्षाचा पाठिंबा आहे. त्याचवेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही या पक्षाला विरोधी पक्षात राहावे लागलं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. पण आम्ही निश्चितच फासे पलटवणार आहोत, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.democracy against the biggest party but we will turn the dice, warns Devendra Fadnavis


प्रतिनिधी

भाईंदर : राज्यात सर्वात कमी आमदार असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. सरकारला या पक्षाचा पाठिंबा आहे. त्याचवेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही या पक्षाला विरोधी पक्षात राहावे लागलं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे.

पण आम्ही निश्चितच फासे पलटवणार आहोत. शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात टर्न टेबल लॅडर दाखल झाला असून त्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते.

काँग्रेसने कुणाला अध्यक्ष करावं आणि कुणाला करू नये ही त्यांची अंतर्गत बाब असून देशात आता काँग्रेस पक्ष उरलाच कुठे आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला. कॉंग्रेस आमदार आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला.

राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना सर्वांनीच जपून बोललं पाहिजे, असाल सल्ला फडणवीस यांनी दिला. नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यासाठी पटोले यांना फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

democracy against the biggest party but we will turn the dice, warns Devendra Fadnavis

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*