नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

नेपाळमध्ये राजेशाही आणावी आणि हिंदू राष्ट्र घोषित करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने मोर्चा काढला. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असून तो कमल थापा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. Demand for re-declaration of Nepal as Hindu Rashtra


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : नेपाळमध्ये राजेशाही आणावी आणि हिंदू राष्ट्र घोषित करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने मोर्चा काढला. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असून तो कमल थापा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.

नेपाळी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आणि पंतप्रधान के. पी. ओली यांच्या मंत्रिमंडळाने संसद बरखास्तीची शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करून निवडणूक जाहीर केली होती.2006 मध्ये जन आंदोलनानंतर राजेशाही रद्द केली आणि 2008 मध्ये नेपाळचा हिंदू राष्ट्राचा दर्जा काढून ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनविले होते. आता पुन्हा नेपाळला हिंदू राष्ट्र बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Demand for re-declaration of Nepal as Hindu Rashtra

त्याच्या समर्थनार्थ राजधानी काठमांडूत भव्य मोर्चा काढण्यात आला. हिंदू राष्ट्राची मागणी, ओली यांच्या संसद बरखास्त करण्याच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेण्यात आला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*