पाकिस्तानात सिंधूदेशाची मागणी, शेकडो सिंधी नागरिक रस्त्यावर; मोदींसह अन्य राष्ट्रप्रमुखांची छायाचित्र झळकली


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात आम्हाला स्वातंत्र्य द्या, अशी मागणी करत शेकडो नागरिकांनी मोर्चा काढला. सिंधुदेश निर्माण करण्यासाठी जागतिक नेत्यांचे लक्ष्य वेधण्यासाठी त्यांची छायाचित्रे असलेले फलकही या प्रसंगी आंदोलकांनी झळकविले.
Demand for Indus in Pakistan, hundreds of Sindhi citizens on the streets; Pictures of Modi and other heads of state flashed

अखंड हिंदुस्तानची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान नंतर बांगलादेश हे देश उदयास आले. पण, त्यापूर्वी सिंध प्रांतात राहणाऱ्या सिंधी नागरिकांवर मुस्लिम आक्रमकांनी हल्ले केले, त्यांचे धर्मांतर केले. त्यांची घरे बळकावली.अनेकजण फाळणीनंतर जिवाच्या भीतीने पळून गेले. अनेकजण भारतात आले. जे राहिले तर अत्याचाराला बळी पडत आहेत. एकेकाळी बहुसंख्य असलेले सिंधी लोक आता पाकिस्तानात अल्पसंख्याक ठरले आहेत. त्यांनी आता अन्याया विरोधात आवाज उठवून स्वतंत्र सिंधूदेशाची मागणी केली आहे.

सिंध प्रांतातील सन्न शहरात हा मोर्चा काढला. त्यात विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांची छायाचित्र आंदोलकांनी धरली होती. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र होते.

Demand for Indus in Pakistan, hundreds of Sindhi citizens on the streets; Pictures of Modi and other heads of state flashed

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी