लाल किल्ल्यावरील हल्ल्याची स्क्रिप्ट आधीपासूनच होती तयार; SIT तपासातून मोठा खुलासा; इकबाल सिंहने भडकावले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांमधील काही घटकांनी केलेला हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर केलेला हल्ला यांची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा खुलाला दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून पुढे आला आहे.delhi police SIT revalations, delhi violance scripted much earlier

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी काही उपद्र काही खास समूहांना लाल किल्ला परिसर आणि आयटीओवर एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा हेतू गर्दीत सामील होऊन हिंसाचाराची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीत मिसळवून हिंसाचार वाढविणे हा होता, असे तपासात पुढे आले आहे.इकबाल सिंहने भडकावले पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, इकबाल सिंह नावाच्या एका दंगलखोराने लाल किल्ल्यावर गर्दी जमा केली. त्या गर्दीला भडकावले आणि लाहोर गेट तोडण्यासाठी चिथावणी दिली.

इकबालच्या चिथावणीनंतर हिंसक आंदोलकांनी लाहोर गेट तोडले. इकबाल सिंह सध्या फरार आहे. दिल्ली पोलिसांनी इकबाल सिंहवर 50 हजार रुपयांचे इनाम लावले आहे.

150 जणांना अटक, 44 एफआयआरची नोंद सीसीटीव्ही फुटेड आणि अन्य व्हिडिओ तपासल्यानंतर त्यातील माहितीची पडताळणी करून पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने त्याची छायाचित्रे काढून ली ती प्रसिद्ध केली.

यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगलखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे १५० जणांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघा चिथावणीखोरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

delhi police SIT revalations, delhi violance scripted much earlier

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था