दिल्ली मेट्रोला 1500 कोटींचा तोटा;कोरोना लॉकडाऊनचा फटका; सहा महिने सेवा ठप्प


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमध्ये दिल्ली मेट्रोचे प्रत्येक मिनिटाला 58 हजारांचे नुकसान झाले. तसेच सहा महिने सेवा ठप्प राहिल्याने 1500 कोटींचा तोटा झाला.Delhi Metro loses Rs 1,500 crore Corona lockdown shot Service stopped six months

मेट्रो स्थानकांवरील 400 रिटेल आऊटलेट्स बंद राहिल्याने भाडे मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये दररोज 8 कोटी 30 लाख रुपयांचा तोटा मेट्रोच्या झाला. जाहिरातीचे उत्पन्नही बंद झाले.देशात सर्वप्रथम मेट्रोसेवा सुरु करण्याचा मान दिल्लीला मिळाला. त्याचे उदघाटन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते.काही ठिकाणी उन्नत मार्ग सोडले तर दिल्लीतील बहुतांशी मेट्रो जमिनीखालून धावते.

त्यामुळे रस्त्यावर रहदारी अनेक ठिकाणी कमी दिसते. दिल्ली मेट्रोची 285 स्थानके असून तिचा विस्तार 389 किलोमीटर आहे. अशा अवाढव्य मेट्रोचे व्यवस्थापन आणि देखभाल सोपे काम नाही.प्रवाशांची संख्या वाढल्यावर आर्थिक घडी बसण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

Delhi Metro loses Rs 1,500 crore Corona lockdown shot Service stopped six months

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती