Delhi High Court verdict hits Mukesh Ambani, suspends Reliance deal with Future Retail

दिल्ली हायकोर्टाच्या निकालाने मुकेश अंबानींना धक्का, फ्यूचर रिटेलशी रिलायन्सचा करार रोखला

ई-कॉमर्समधील दिग्गज जागतिक कंपनी अ‍ॅमेझॉनच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी घेतली. यावेळी हायकोर्टाने रिलायन्ससोबत फ्यूचर रिटेलला करार करण्यापासून रोखले आहे. 24,713 कोटी रुपयांचा हा करार आहे. या प्रकरणात कोर्टाने सिंगापूर लवादाचा आदेश कायम ठेवला. कोर्टाने म्हटले आहे की, फ्यूचर समूहाने जाणीवपूर्वक लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केले. Delhi High Court verdict hits Mukesh Ambani, suspends Reliance deal with Future Retail


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ई-कॉमर्समधील दिग्गज जागतिक कंपनी अ‍ॅमेझॉनच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी घेतली. यावेळी हायकोर्टाने रिलायन्ससोबत फ्यूचर रिटेलला करार करण्यापासून रोखले आहे. 24,713 कोटी रुपयांचा हा करार आहे. या प्रकरणात कोर्टाने सिंगापूर लवादाचा आदेश कायम ठेवला. कोर्टाने म्हटले आहे की, फ्यूचर समूहाने जाणीवपूर्वक लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केले.एवढेच नाही तर कोर्टाने किशोर बियाणी आणि फ्यूचर ग्रुपमधील इतरांची संपत्ती संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. यासह कोर्टाने फ्यूचर ग्रुपच्या संचालकांना पीएम रिलीफ फंडामध्ये 20 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना या रकमेतून कोरोना विषाणूची लस उपलब्ध करून दिली जाईल.

Delhi High Court verdict hits Mukesh Ambani, suspends Reliance deal with Future Retail

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*