विशेष प्रतिनिधी
सातारा : कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत आहे. पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलंय.dehu Bijotsav is going to happen: Bandatatya Karadkar
कोरोनामुळे सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. तर पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी दिलेला इशारा सरकारची डोकेदुखी ठरणार आहे.
काय म्हणाले बंडातात्या कराडकर?
- कोरोनाच प्रस्त वाढत नाही तर तसं भासवलं जातंय.
- लोकसंखेच्या प्रणाणात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूप कमी आहे.
- सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो.
- केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत.
- देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी.
- पैठणच्या उत्सवा दिवशी शुकशुकाट असणे हे आमच्या बुध्दीला पटत नाही.
- सरकारची चाकोरी तोडून आम्ही सर्व वारकरी जमणार आहोत.
- कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवले जाताय, खोटे रिपोर्ट दिला जात आहे.
- जेवढे कोरोनाचे पेंशंट होते त्यांना लुटले.
- कोरोना बाधित म्हणून बॉडी दिली जात नव्हती. त्या मृतदेहाचे सर्व अवयव गायब केले जात होते.
- कोरोनाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊन दहशत निर्माण केली.
- धार्मिक स्थळे उघडली तर लोकांच्या मनातून घबराट, भिती जाईल.
- आत्मविश्वास हा अध्यात्म आहे, अध्यात्माची शक्ती असल्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
- देहू आणि पैठणची यात्रा भरली पाहिजे, यासाठी आम्ही ठाम आहोत.
- आमच्यावर जे गुन्हे दाखल करणार त्याला आम्ही सामोरे जाणार, आंदोलन करणारच.
- सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार.
- सरकारशी आम्ही बोलणार नाही, परवानगी मागणार नाही.