संरक्षण मंत्रालयाकडून शस्त्र खरेदीला जोरदार वेग, रणगाडाभेदी चार हजार क्षेपणास्त्रांची होणार खरेदी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशाच्या तिन्ही सेनादलांची मारक क्षमता वाढविण्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये संरक्षण मंत्रालयाने शस्त्र खरेदीला वेग दिला असून अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा देखील वेगाने स्वीकार केला जात आहे. रणगाडाविरोधी ४ हजार ९६० क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सरकारी मालकीच्याच भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) या कंपनीसोबत १ हजार १८८ कोटी रुपयांचा करार केला आहे. Defense ministry will buy four thousand missiles tank

या क्षेपणास्त्रांच्या आगमनामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. ही क्षेपणास्त्रे १ हजार ८५० मीटरपर्यंत मारा करू शकतात. जमिनीवरून आणि वाहनावर बसविण्यात येणाऱ्या लाँचर्सच्या माध्यमातून देखील ही क्षेपणास्त्रे डागता येऊ शकतात. ती लष्करामध्ये पूर्णपणे समाविष्ट होण्याची प्रक्रिया येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.संरक्षण मंत्रालयाच्या शस्त्र खरेदी विभागाने आता ‘मिलान-२ टी’ या रणगाड्यांच्या खरेदीसाठी ‘बीडीएल’सोबत करार केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीनेच या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली असली तरीसुद्धा त्यासाठीचा परवाना हा फ्रेंच कंपनी एमबीडीए मिसाईल सिस्टिम्स या कंपनीकडून मिळाला आहे.

Defense ministry will buy four thousand missiles tank

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती