वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवा मानबिंदू आज प्रस्थापित झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या दुसऱ्या प्रॉडक्शन लाइनचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरुमध्ये केले. हिंदुस्थान एरोनॉटिक्सला भारतीय हवाई दलाकडून ४८००० कोटींची तेजस एम १ लढाऊ विमानांची ऑर्डर मिळाली आहे. त्याचे उत्पादन या प्रॉडक्शन लाइनवर होणार आहे.Defence Minister Rajnath Singh inaugurates Hindustan Aeronautics Limited’s (HAL) second LCA production line in Bengaluru.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात हिंदुस्थान एरोनॉटिक्सला संरक्षण दलाकडून मोठी ऑर्डर मिळाली. अजूनही ऑर्डर मिळत राहतील. एवढेच नाही तर अन्य देशही तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याही ऑर्डर लवकरच कंपनीला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Karnataka: Defence Minister Rajnath Singh inaugurates Hindustan Aeronautics Limited's (HAL) second LCA (Light Combat Aircraft) production line in Bengaluru. pic.twitter.com/L70Fo2r0FD
— ANI (@ANI) February 2, 2021
तेजसच्या उत्पादनातून भारत हवाई संरक्षण क्षेत्रात नवी उंची गाठेल. त्याचबरोबर संरक्षण उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रातही मोठी झेप घेईल. यातून मेक इन इंडिया उत्पादनांची गुणवत्ता जगात स्थापित होईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.