लाल किल्यात घुसणाऱ्या दीप सिध्दूशी संबंध नाही, खासदार सनी देओल यांनी केले स्पष्ट


दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आंदोलनात लाल किल्यात घुसणाऱ्या दीप सिध्दूशी आपला काहीही संबंध नाही, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनी स्पष्ट केले आहे. Deep Sidhu entering the Red Fort MP Sunny Deol clarified


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आंदोलनात लाल किल्ल्यात घुसणाऱ्या दीप सिध्दूशी आपला काहीही संबंध नाही, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनी स्पष्ट केले आहे.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या उपद्रवासाठी शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धूला जबाबदार धरले आहे. शेतकऱ्यांना दीप सिद्धूने भडकावले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याकडे कूच केली, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्याचबरोबर दीप सिद्धूचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो सनी देओल आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतोय. या छायाचित्रावर सनी यांनी एका पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.सनी देओल यांनी म्हटले आहे की, लाल किल्यावर जे काही घडले ते बघून माझे मन खूप दुःखी झाले आहे. मी यापूर्वीही 6 डिसेंबरला ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले होते की, माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबध नाही. दीप सिद्धू एक मॉडेल आणि अभिनेता आहे. ‘रमता जोगी’ या चित्रपटातून त्यांने सिनेक्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने कायद्याची पदवीही घेतली आहे. 2019 मध्ये गुरुदासपूर येथून भाजपा उमेदवार सनी देओल यांच्यासाठी त्याने प्रचार केला होता

दीप सिद्धू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही, असे स्पष्टीकरण दिप सिद्धूने दिले आहे.

Deep Sidhu entering the Red Fort MP Sunny Deol clarified

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती