केंद्राचा निर्णय; कोव्हिशिल्ड लस तूर्तास भारतीयांनाच, मार्चनंतर होणार निर्यात

सीरम इंस्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस तूर्तास भारतीयांना दिली जाणार असून ती निर्यात केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. Decision of the Center Covishield vaccine For Indians only export after March


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीरम इंस्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस तूर्तास भारतीयांना दिली जाणार असून ती निर्यात केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

भारत बायोटिक्सची कोव्हेक्सीन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या दोन लाशीना आपत्कालीन वापरासाठी केंद्राने परवानगी दिली होती. तसेच कोव्हिशिल्ड लस निर्मितीस हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोव्हिशिल्ड लसीला मार्च – एप्रिल महिन्यात निर्यातीला परवानगी देण्यात येणार आहे.सीरमचे अध्यक्ष आदर पुनवाला यांनी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून विकसनशील देशांसाठी 100 कोटी डोस देण्याचे करार केल्याचे सांगितले.

Decision of the Center Covishield vaccine For Indians only export after March

भारत हा लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे नागरिकांना लसी कमी पडू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या आम्ही सरकारला लस देऊ शकतो. प्रत्येकाचे लसीकरण करणे शक्य नाही. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा लागेल , असे पुनावाला म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*