कोरोना विरोधी लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाचा नालासोपारात मृत्यू ; आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचा नागरिकांचा आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात कोरोना विरोधी लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.Death of a senior who went for vaccination against corona in Nalasopar Citizens allege lack of health facilities

उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र केंद्रात रुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचाराची सोय नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.शुक्रवारी सकाळी नालासोपाराच्या पाटणकर परिसरात राहणारे हरीशभाई पांचाळ ( वय 63) लसीकरण केंद्रात गेले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले असता चक्कर आली आणि खाली पडले. पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लसीकरण केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, जी होती ती डॉक्टरांना ने आण करण्यासाठी होती, त्यात ऑक्सिजनची सुविधा नव्हती. त्यामुळे चालकाने रुग्णाला नेण्यास नकार दिला.

सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी रुग्णवाहिकेतून पांचाळ यांना नेण्यासाठी भाग पाडले. मात्र पांचाळ यांचा रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता, तसेच सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा आहे. लास घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
डॉ. सुरेखा वाळके, वैद्यकीय अधिकारी , वसई विरार महापालिका

Death of a senior who went for vaccination against corona in Nalasopar Citizens allege lack of health facilities

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*