दत्तात्रय होसबळेंची बढती संघातल्या generational change ची निदर्शक!!

विशेष प्रतिनिधी

बेंगळुरू – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण बदल झाला असून दत्तात्रय होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहपदी निवड होणे, हा संघातला generational change निदर्शक असल्याचे स्पष्ट होत आहे. Dattatreya Hosabale Appointed As The New Sirkaryawah Of RSS

होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांची सरकार्यवाहपदी निवड झाली आहे, असा तर्क देशातला मीडिया लावत असला, तरी त्याच एकमेव निकषावर ही निवड झाली, असे मानणे ही मूलभत चूक असून संघाची कार्यपद्धती नेमकी माहिती नसल्याचेही ते निदर्शक आहे.

 • होसबळेंच्या नियुक्तीच्या निमित्ताने संघ परिवारातील निर्णायक पदांवर दक्षिणेतले राज्य कर्नाटक यातून दोन महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचाही योगायोग यातून दिसतो आहे. भाजपचे सर्वात पॉवरफुल संघटन महामंत्री बी. एल. संतोष हे देखील कर्नाटकातून येतात. त्यामुळे संघ परिवाराचा पुढचा राजकीय – सामाजिक फोकल पॉइंट दक्षिणेकडील राज्ये असल्याचे मानता येऊ शकेल. पण ते देखील तेवढेच मानणे चूक ठरेल.
 • कारण हा नुसता उत्तर – दक्षिण power balance नाही तर नव्या पिढीच्या भूमिका, आशा – आकांक्षांचेही त्यात महत्त्वपूर्ण प्रतिबिंब पडताना दिसते आहे आणि भविष्यकाळात दिसणार आहे, याचेही ते निदर्शक आहे. संघ परिवारात नव्या विचारांचे मंथन, संप्रेषण आणि कार्यवहन या दृष्टीनेही त्याकडे पाहिले पाहिजे.
 • संघ परिवाराचा राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक दृष्टीकोनच नुसता अखिल भारतीय नाही, तर महत्त्वाच्या निर्णय प्रकियेतील घटक देखील तेवढेच “अखिल भारतीय” असल्याचा political message यातून वाचता आला पाहिजे.
 • विद्यार्थी परिषदेतून संघात येऊन संघाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर जाणारे दत्तात्रय होसबळे हे पहिले स्वयंसेवक ठरले आहेत. संघ परिवारातील विद्यार्थी परिषदेच्या प्रभावाचेही निदर्शक मानले पाहिजे. त्यातूनही नव्या उमेद – विचार – कार्यशैलीचा आगाज संघ परिवारात होतो आहे, असे मानले पाहिजे.
 • देशाच्या लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या तरूण असताना त्याचे प्रतिबिंब संघ परिवाराच्या धोरणात पडल्याचेही यातून दिसून येते.
 • संघ परिवारासाठी आत्तापर्यंत untouched मानल्या गेलेल्या विषयांवरही दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केले आहे. त्याला समाजात अधिमान्यता मिळालेली दिसली आहे. समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही, हे त्यांचे विधान चांगले चर्चेत आले होते. त्या विषयावरच्या त्यांच्या मोकळ्या विचारांचे समाजाच्या विविध स्तरांनी स्वागत केले होते.
 • पश्चिम बंगाल – केरळच्या निवडणूकांच्या निमित्ताने भाजपच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील विस्ताराची मीडियात चर्चा होत आहे. ती बरीच वरवरची दिसते. त्या पलिकडे जाऊन संघ आणि संघ परिवार विचार करतो आणि मग त्याची अंमलबजावणी दिसते… हे दत्तात्रय होसबळेंच्या नियुक्तीच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

 

Dattatreya Hosabale Appointed As The New Sirkaryawah Of RSS

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*