अयोध्या राम मंदिर निधी संकलन अभियानात भारतीय एकात्मतेचे दर्शन ; न्यायमूर्ती केटी थॉमस आणि अली अकबर यांचे योगदान

अयोध्येत राम मंदिर बांधन्यासाठी निधी संकलन अभियानांतर्गत राम मंदिर निर्मितीसाठी सहकार्याचा ओघळे दिवसेंदिवस वाढत आहे.सर्व धर्म समभाव अशी ख्याती असलेल्या भारतात मंदिर बांधण्यासाठी हिंदु सह इतर धर्मातील लोकही भरभरून प्रतिसाद देत आहेत.

विशेष प्रतिनिधी

त्रावणकोर : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोक दान देत आहेत. केरळमधील त्रावणकोर येथील रॉयल फॅमिली, सेवानिवृत्त न्यायमूर्ती केटी थॉमस आणि चित्रपट दिग्दर्शक अली अकबर ह्या नामांकित व्यक्तींनी देखील मंदिरासाठी दान दिले आहे. Darshan of Indian Integration in Ayodhya Ram Temple Fundraising Campaign; Contributions of Justices Katie Thomas and Ali Akbar

ते आता राम मंदिर बांधकाम अभियानाचा एक भाग बनले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रने केरळमधील सर्व 14,000 गावांपर्यंत 21 फेब्रुवारीपूर्वी निधी संकलनासाठी पोहचण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान , आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जवळपास सहाशे कोटींचा निधी संकलित झाला आहे.

Darshan of Indian Integration in Ayodhya Ram Temple Fundraising Campaign; Contributions of Justices Katie Thomas and Ali Akbar

यातील १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट चेकद्वारे देण्यात आली आहे. राम मंदिरासाठी संकलित होत असलेला निधी रामनगरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शाखांमध्ये जमा होत आहे. मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. दररोज जमा होत असलेला निधी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जात आहे. राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे .

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*