औरंगाबाद मध्ये रात्री 8 नंतर संचारबंदी ; 5 व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई ;१९ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत नियम लागू

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता आहे. १९ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत रात्री ८ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल रात्री उशिरा हा संयुक्त आदेश जारी केला. Curfew in Aurangabad after 8 pmसध्या शहरात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आहे. ती आता रात्री ८ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधित राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केेले आहे.

Curfew in Aurangabad after 8 pm

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*