वृत्तसंस्था
पुणे : हिंदू धर्म नव्हे एल्गारच सडक्या मेंदूच्या डोक्यांनी भरली आहे, अशी खरमरीत टीका ब्राम्हण महासंघाने एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी याच्या वक्तव्यानंतर केली आहे.Criticism of the Brahmin Federation; Demand for stern action against Sharjeel Usmani
एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी याने हिंदू समाज सडलेला असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंचा अवमान केला होता. त्या नंतर राज्यात संतप्त आणि तिखट प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आता ब्राम्हण महासंघाने खरमरीत टीका केली आहे. महासंघाचे अध्यक्ष अनिल दवे म्हणाले, परिषदेच्या माध्यमातून सडक्या मेंदूची मंडळी अभद्र बोलण्याची शक्यता होतीच. शरजील उस्मानी, अरुंधती रॉय कुजकी विधाने करतील, अशी शक्यता आम्ही पूर्वीच पोलिसांना बोलून दाखविली होती.
ही बाब उस्मानी याच्या विधानानंतर खरी ठरली आहे. उस्मानी या मूर्ख आणि विकृत माणसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महासंघाने केली होती. आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.