Good news For Cricket Lovers in Marathwada नांदेड मध्ये क्रिकेट प्रशिक्षण केंद्र ; रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीचा पुढाकार

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत .मराठवाड्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंद वार्ता.


विशेष प्रतिनिधी

नांदेड : भारत हा क्रिकेट प्रेमी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. गल्ली बोळातुन खेळत अनेक दिग्गज खेळाडू भारतीय संघात आपला ठसा उमटवतात. आजी- माजी खेळाडू हे आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर क्रिकेट अकादमी सुरू करतात. आपल्या भविष्याचा विचार करता आपल्या अकादमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचे काम ते करत असतात. Cricket Acadamy in Nanded by Rohit sharma and Dhawal Kulkarni

रॉजर बिन्नी, मदनलाल, दिलीप वेंगसरकर, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी या खेळाडूंच्या अनेक अकादमी कार्यरत आहेत. आता या साखळीत रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी यांचे नाव जोडले जाणार आहे.



वेगवान गोलंदाज कुलकर्णी याने सोमवारी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavhan यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .यावेळी क्रिककिंगडमचे पराग दहिवाल त्याच्यासोबत होते. या भेटीदरम्यान कुलकर्णी आणि दहिवाल यांनी अशोक चव्हाण यांच्याशी नांदेड येथे स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरू करण्याबाबत चर्चा केली.

धवल कुलकर्णी हा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज असून सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते. तर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यादरम्यान १२ वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १९ विकेट्स घेतल्या आहेत.याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये आजवर त्याने ९१ सामने खेळले आहेत.

गोलंदाज कुलकर्णीनेही ट्विट करत आपल्या आपण नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.

स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. “प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडला क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. कुलकर्णी व दहिवाल यांनी याबाबत माझ्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. ही अकादमी सुरू झाल्यास नांदेडच्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल”, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

विशेष म्हणजे, कुलकर्णीने अकादमी उभारण्याच्या दृष्टीने नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. तसेच आपल्या भेटीची आठवण म्हणून त्यांनी अशोक चव्हाण यांना भारतीय संघाची एक जर्सी भेट दिली आहे.

Cricket Acadamy in Nanded by Rohit sharma and Dhawal Kulkarni

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*