भाजपच्या नेत्याच्या घरासमोर आंदोलक शेतकऱ्यांनी शेण ओतल्याने अमररिंदर सिंग रागवले असतील…??, की आणखी वेगळ्याच कारणाने…??


विशेष प्रतिनिधी

चंडीगड : पंजाबच्या होशियारपूरचे भाजपचे नेते तिकशान सूद यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलकांनी शेण ओतले आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग संतापले… अशी बातमी आली. वरवर पाहता ही बातमी थोडी विचित्र वाटेल किंवा पाहा कसा अमरिंदर सिंगांना शेतकरी आंदोलकांनी हा गैरमार्ग अवलंबल्याने राग आला, असेही काहीजणांना वाटले असेल…अमरिंदर सिंगांच्या समर्थकांनी तशा बातम्याही सोशल मीडियात चालविल्या आहेत… पण या बातमीचा राजकीय अर्थ तेवढ्याच पुरता मर्यादित नाहीए… वरवर दिसतोय त्या पेक्षाही त्यात सखोल अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे… Cow dung-laden trolley unloaded outside BJP leader’s house in Punjab

  • मुरब्बी काँग्रेस नेते अमरिंदर सिंगांना शेतकरी आंदोलनातली राजकीय हवा निघून चालल्याची किंवा राजकीय हवा प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली हा आहे.
  • शेतकरी आंदोलन ४० दिवसांचे होत आले आहे. केंद्र सरकारशी नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या झडताहेत… पण त्याचे राजकीय फळ जसे आणि जेवढे मिळायला पाहिजे, तसे मिळत नाहीच उलट राजकीय वातावरण फिरत चालल्याचे दिसायला लागले आहे… समाजातली श्रीमंत शेतकऱ्यांविषयीची सुरवातीची सहानुभूती संपून तिचे रूपांतर तिरस्कारात व्हायला लागले आहे.
  • राकेश टिकैत सारख्या नेत्यांनी पंडितांविरोधातील वक्तव्य करून त्याला जातीय रंग दिल्याने आंदोलनाकडे शहरी आणि निमशहरी जनता आता तिरस्काराने बघायला लागली आहे.
  • सुरवातीला आंदोलनाला अगदी कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांमधून पाठिंबा मिळाला. कॅनडाच्या पंतप्रधानांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन पाहिला आणि भारत सरकारकडून “राजनैतिक मार” खाल्ला.
  • आणि आता तर अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टिंगच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टॉप रेटिंगचा रिझल्ट बाहेर आल्यानंतर शेतकरी आंदोलनाचे सगळे राजकीय मूसळ केरात गेल्यात जमा आहे. आंदोलनाचा फायदा घेऊन काँग्रेस आपली डूबती नाव सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण सोनियाजी आणि राहुल गांधी ऐन मोक्याच्या वेळी शेतकऱ्यांना लढायला सांगून स्वतः इटलीला निघून गेल्याने काँग्रेसचीही पुरती हवा निघाली आहे.
  • अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त असल्याचे अमरिंदर सिंगांसारख्या चाणाक्ष नेत्याच्या लक्षात आले नसते तरच नवल!! त्यातच शेतकरी आंदोलक भाजपच्या नेत्याच्या घरासमोर शेण ओतायला लागले तर त्याचे राजकीय बुमरँग आपल्यावरच शेकेल, असे अमरिंदर सिंगांना वाटले असल्यासही नवल नाही… त्यातूनच मग त्यांनी आंदोलकांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देऊन शेतकरी आंदोलनापासून स्वतःचे अंतर राखायला सुरवात केली आहे… अमरिंदर सिंगांच्या आजच्या इशाऱ्याचा हा खरा आणि सखोल राजकीय अर्थ आहे.

Cow dung-laden trolley unloaded outside BJP leader’s house in Punjab

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी