अजयकुमार लल्लूंच्या नौटंकीला न्यायालयाची चपराक, अजामीनपात्र वॉरंट जारी

ऐन कोरोनाच्या काळात राजस्थान- आग्रा सीमेवर स्थलांतरीत मजुरांना बस पुरविण्याची नौटंकी करणारे उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्या नौटंकीला न्यायालयानेच चपराक दिली आहे. लल्लू यांच्याविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. Court issues non-bailable warrant to Ajay Kumar Lallu


वृत्तसंस्था

लखनऊ : ऐन कोरोनाच्या काळात राजस्थान-आग्रा सीमेवर स्थलांतरीत मजुरांना बस पुरविण्याची नौटंकी करणारे उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्या नौटंकीला न्यायालयानेच चपराक दिली आहे. लल्लू यांच्याविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. Court issues non-bailable warrant to Ajay Kumar Lallu

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू झाल्यावर हजारो स्थलांतरीत मजूर उत्तर प्रदेशात पायी निघाले होते. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून त्यांच्यासाठी बसची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मात्र, यावेळी लल्लू यांनी नौटंकी करत कॉंग्रेसकडून बसची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. सरकारने या बसची लिस्ट मागितल्यावर देऊ शकले नाहीत. मात्र, सरकारविरोधी घोषणाबाजी करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडविला. यावेळी पोलीसांनी लल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांवर महामारी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला होता.

Court issues non-bailable warrant to Ajay Kumar Lallu

आग्रा न्यायालयात यासंदर्भात खटला चालू आहे. मात्र, अजयकुमार लल्लू न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे आग्रा विशेष न्यायालयाचे न्यायाधिश उमाकांत जिंदाल यांनी लल्लू यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*