देशाला हव्यात चार राजधान्या, ममता बॅनर्जी यांची मागणी; कोलकत्ताला मान देण्याचा आग्रह


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : देशाची राजधानी दिल्लीच का, दिल्लीतच का संसदेचे अधिवेशन भरवायचे ? देशाच्या चार कोपऱ्यात राजधान्या हव्यात, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. country needs four capitals Mamata Banerjee demand Urge to respect Kolkata

राज्य सरकारतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती देशप्रेम दिवस म्हणून साजरी केली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच ममता यांनी ही मागणी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


जय श्रीराम घोषणेने ममता नाराज चक्क भाषण करण्यास नकार


त्या म्हणाल्या, एकेकाळी कोलकत्ता देशाची राजधानी होती. त्यामुळे या शहराला दुसऱ्या राजधानीचा मान मिळाला पाहिजे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी चार राजधानीचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा, अशी सूचना केली.

केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविताना त्या म्हणाल्या, एक देश, एक नेता, एक रेशनकार्ड, एक पक्ष हा विचार बदलण्याची वेळ आली आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथे आणि उत्तर भारतात उत्तर प्रदेश, पंजाब वा राजस्थानातही राजधानी बनवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


नेताजींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलची सक्ती, ममतांचा कोप आणि राजकीय दरी रूंदावल्याची छाप


ममता बॅनर्जी म्हणाल्या..

  • दरवर्षी 23 जानेवारीला राष्ट्रीय सुटी द्यावी
  • राजरहाट परिसरात आझाद हिंद स्मारक उभारणार
  • नेताजींच्या नावाने विश्वविद्यालय उभारणार असून राज्य सरकार त्याचा खर्च करणार आहे.
  • प्रजासत्ताक दिनाची परेड नेताजींना समर्पित

country needs four capitals Mamata Banerjee demand Urge to respect Kolkata

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती