मकर संक्रातीपासून सुरू होणार लसीकरण मोहीम, पंतप्रधान घेणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक


मकर संक्रांती म्हणजे १४ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत तयारीवर चर्चा करण्यासाठी ११ जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह आणि राज्यांना लागणाऱ्या मदतीबाबत चर्चा होईल. Coronavirus vaccination drive will start from Makar Sankrati and the Prime Minister will hold a meeting With Chief Ministers of all states


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मकर संक्रांती म्हणजे १४ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत तयारीवर चर्चा करण्यासाठी ११ जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह आणि राज्यांना लागणाऱ्या मदतीबाबत चर्चा होईल.

4 जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते की, देशभरात दहा दिवसांच्या आत लसीकरणाला सुरुवात होईल. आशा केली जात आहे की, मकर संक्रांती म्हणजेच, 14 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली जाईल.पहिल्या फेजमध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि हाय रिस्क असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यासाठी देशभरात व्हॅक्सीनेशचा ड्राय रन करण्यात आला आहे.डायरेक्टर जनरल सिवील एविएशनने व्हॅक्सीनच्या ट्रांसपोर्टेशनसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार व्हॅक्सीन ड्राय आइसमध्ये बंद करुन विमानातून देशभरात वितरीत केली जाईल.

कोरोना व्हॅक्सीनबाबत भारतासाठी अजून एक चांगली बातमी आहे. भारत बायोटेकने देशात नेजल व्हॅक्सीनच्या फेज-1 ट्रायलच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवला आहे. भारत बायोटेक कोरोनावरील कोव्हॅक्सिन तयार करत आहे.

vaccination drive will start from Makar Sankrati and the Prime Minister will hold a meeting With Chief Ministers of all states

देशात मागील 24 तासात 18 हजार 94 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 20 हजार 532 ठीक झाले असून 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 2.22 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 16 राज्यांमधील 98% रुग्ण ठीक झाले आहेत. परंतू, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, सिक्किम आणि उत्तराखंडमध्ये देशभरातील ठीक होणाऱ्या रुग्णांपेक्षा (96.4%) कमी आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था