कोरोनाचा परिणाम अनिल देशमुख यांच्या मेंदूवरही, योग्यता लक्षात घेऊन बोला, अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल

अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्मविभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Corona’s effect on Anil Deshmukh’s brain too, speak with merit, Atul Bhatkhalkar’s attack


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्मविभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.कोरोना अनिल देशमुखांना झाला आही की त्यांच्या मेंदूला झाला आहे? असा सवाल करून भातखळकर म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या देशहिताच्या ट्विटची देखील आम्ही चौकशी करू अशा प्रकारचं मोठं व घाणेरडं वक्तव्य केलं आहे. राजकारणासाठी व द्वेष व मत्सरापोटी अशा प्रकारचं घाणेरडं काम राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्राची जनता येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र व संपूर्ण देशाच्या हिरोंविरोधात अशा प्रकारचं बोलल्याबद्दल धडा शिकवेल.
या मुद्यावरूनवरून आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, कसाबला बियार्णी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर, आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!

आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले असे सांगून शेलार म्हणाले, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे. आपल्या देशाच्या अंतर्गत विषयात परकीयांनी बोलू नये, असं जर म्हटलं तर सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांच्या ट्विटवर चौकशी महाविकास आघाडीचे या सरकारमधील बसलेली मंडळी करणार, तशी मागणी करणार. पण या स्वतंत्र भारतात आझाद काश्मीरचा बॅनर घेऊन जर कुणी मेहक प्रभू उभी राहिली, तर तिची चौकशी बंद होणार तिची सुटका होणार. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांचं समर्थन मिळाल्यावर, ज्या याकूबने मुंबईवर हल्ला केला देशावर हल्ला केला. त्याची शिक्षा माफ करा असं म्हणणाऱ्यांबरोबर शिवसेना सत्तेत बसणार. पण जे केवळ महाराष्ट्राचे भूषण नाही तर भारतरत्न आहेत. अशा लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर चौकशीची मागणी करणार आणि गृहमंत्री त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असं म्हणणार, या पेक्षा संतापजनक आणि हीन राजकारण या महाराष्ट्रात कुणी पाहिलं नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, त्यावेळी सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांच्यावर चौकशीचा फेरा घाला याबद्दलची चर्चा होते. उद्धव ठाकरे उत्तर द्या, अशी आमची मागणी आहे.

शेलार म्हणाले की, कुणी कोणाबद्दल काय ट्विट केलं पाहिजे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीचं ट्विट लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनी केलं. त्यामध्ये कुणाची बाजू व कुणाच्या विरोधात न म्हणता आमच्या अंतर्गत विषयात बोलू नका, आम्ही एक आहोत. आम्ही एक आहोत म्हटल्यावर यांच्या पोटात दुखण्याची गरजच काय? आम्ही एकाच दिलाने विचार करू, आमचं आम्ही बघून घेऊ हे म्हटल्यावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व राजू शेट्टी यांना त्रास का होतो आहे. या सर्वांची ही इच्छा आहे का? आमच्या शेतकऱ्यांचे व आमच्या देशाताली प्रश्नावर परदेशात चर्चा व्हावी. अजून नेहरू मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडली नाही आणि आज काँग्रेसबरोबर शिवसेना देखील मिळालेली आहे.

भाजपा नेता राम कदम यांनी म्हटले आहे की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या सर्वांनी विदेशी नागरिकांच्या कटाविरोधात ट्विट केलं होतं. यात भारताची एकजूट आणि आम्ही सर्व एक आहोत, असा संदेश दिला गेला. मग महाराष्ट्र सरकार या ट्वीटला देशविरोधी कसे म्हणते? महाराष्ट्र सरकार या वयात लतादीदींच्या ट्वीटची चौकशी करेल ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. देशाविरूद्ध असलेल्या शक्तींचा प्रवक्ता म्हणून कॉंग्रेस पक्ष कार्यरत आहे.

Corona’s effect on Anil Deshmukh’s brain too, speak with merit, Atul Bhatkhalkar’s attack

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*