कोरोना लवकरच मोसमी आजाराचे रुप धारण करणार, संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील अंदाज

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार कोरोना हा लवकरच मोसमी आजाराचे रुप धारण करू शकतो, असे म्हटले आहे. तज्ञांच्या एका गटाने कोरोनाच्या प्रसारासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी हवामान शास्त्र आणि हवेतील गुणवत्तेचे अध्ययन केले. यात कोविड-१९ आता मोसमी आजाराप्रमाणे आगामी काही काळ त्रास देऊ शकतो, असे म्हटले आहे. Corona will become seasonal fluमुळात सध्या जगभर कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. जागतिक हवामान संघटनेने नेमलेल्या १६ सदस्यीय टीमने म्हटले की, श्वावसासंबंधीचा संसर्ग हा प्रामुख्याने मोसमी असतो. हवामान बदलताच हा संसर्ग वाढतो. कोरोनाने देखील हवामान आणि वातावरणानुसार आपला प्रभाव दाखवला. जर पुढील अनेक वर्ष हा असाच त्रास देत राहिला तर तो एक गंभीर आजार म्हणून समोर येईल.

चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आणि तो जगभरात पसरला. वर्षभरानंतरही शास्त्रज्ञ या आजाराचे गूढ उकलू शकले नाहीत.

Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra
Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

Corona will become seasonal flu

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*