४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांचे १ एप्रिलपासून सरसरकट कोविड प्रतिबंधक लसीकरण; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; नोंदणी आवश्यक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही जावडेकर यांनी केले आहे. corona vccination for all above 45 age to be started from 1st april in india, modi govt decision 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याखेरीज बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.

फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असेही जावडेकरांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला कोरोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली

corona vccination for all above 45 age to be started from 1st april in india, modi govt decision

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*