वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे. ज्यांना पहिला डोस दिला त्यांनाच हा दुसरा डोस दिला जाईल, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.Corona vaccine second dose corona fighter
देशभरात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम 16जानेवारेपासून सुरु झाली होती. आतापर्यंत 41 लाख 38 हजार 918 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली.
त्यातील 8563 जणांमध्येच साइड इफेक्ट्स दिसले आहेत,असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. सरकारने 1 कोटी जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत. पाच महिन्यांपासून रोज 5 ते 6 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. बुधवारी 6356 रुग्ण सापडले तर 69,125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशभरात 1 लाख 52 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाबतचा तपशील
1 ) गेल्या 24 तासांत भारतामध्ये 11, 309 रुग्ण
2) गेल्या 24 तासांत डिस्चार्ज रुग्ण 14,225
3) 24 तासांत मृत्यू 110
5) एकूण प्रकरणे 1,07,77,284
6) एकूण डिस्चार्ज 1,04,62,631
7) एकूण मृत्यू 1,54,596
8) सक्रिय प्रकरणे 1,60,057
9) एकूण लसीकरण: 41,38,918