अवघ्या 2 महिन्यांत 50 कोटी भारतीयांना देता येईल कोरोनाची लस, अझीम प्रेमजींनी सांगितली युक्ती!

Corona vaccine can be given to 50 crore Indians in just 2 months, Azim Premji told the trick

जगप्रसिद्ध उद्योगपती व विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी म्हणाले की, भारत सरकारने कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहिमेमध्ये खासगी क्षेत्रातील सहभागास मान्यता दिल्यास अवघ्या 50 दिवसांत 50 कोटींहून अधिक नागरिकांना लस देता येईल. अशा प्रकारे पाहिल्यास संपूर्ण देशभरातील नागरिकांना अवघ्या 6 महिन्यांत कोरोनाची लस मिळेल. Corona vaccine can be given to 50 crore Indians in just 2 months, Azim Premji told the trick


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उद्योगपती व विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी म्हणाले की, भारत सरकारने कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहिमेमध्ये खासगी क्षेत्रातील सहभागास मान्यता दिल्यास अवघ्या 50 दिवसांत 50 कोटींहून अधिक नागरिकांना लस देता येईल. अशा प्रकारे पाहिल्यास संपूर्ण देशभरातील नागरिकांना अवघ्या 6 महिन्यांत कोरोनाची लस मिळेल.

लसीकरण मोहिमेचे केले कौतुक

बंगळुरू चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या वतीने आयोजित संवाद सत्राला संबोधित करताना अझीम प्रेमजी यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचे कौतुकही केले. ते म्हणाले की, कोविड-19ची ही लस विक्रमी वेळेत तयार करण्यात आली आहे.प्रतिव्यक्ती लसीचा खर्च 700 रुपये

मोदी सरकारने लसीकरणासाठी तब्बल 35000 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे. यामुळे देशभरातील नागरिकांना ही लस मिळेल. या अर्थसंकल्पात तब्बल 50 कोटी नागरिकांना लसी देण्याची अपेक्षा आहे. या लसीची किंमत अंदाजे 700 रुपये प्रति व्यक्ती असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रति डोस 400 रुपयांत लसीकरण शक्य

अझीम प्रेमजी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सांगितले की, आम्ही सीरम संस्थेला प्रति डोस अंदाजे 300 रुपये आणि रुग्णालये आणि खासगी नर्सिंग होमना प्रत्येक डोससाठी 100 रुपये देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खूप मोठी लोकसंख्या प्रति डोस 400 रुपयांत लसीकरण करून घेऊ शकते.

Corona vaccine can be given to 50 crore Indians in just 2 months, Azim Premji told the trick

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी