Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

Corona Update : महाराष्ट्रात 25,000 हून अधिक रुग्ण, अहमदाबादेत नाइट कर्फ्यू

कोरोनाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुन्हा एकदा कहर केला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 25,833 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, 58 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, अहमदाबादेत कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता उद्यापासून रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अहमदाबादमध्ये मॉल, सिनेमा हॉल बंद ठेवण्यात आले आहेत. Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुन्हा एकदा कहर केला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 25,833 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, 58 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, अहमदाबादेत कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता उद्यापासून रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अहमदाबादमध्ये मॉल, सिनेमा हॉल बंद ठेवण्यात आले आहेत.

गुजरातमधील बर्‍याच भागांत कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत अहमदाबाद महानगरपालिकेने ठरवले की, 17 मार्चला रात्री 9 वाजेपासून शहरात नाईट कर्फ्यू लागू केला जाईल. त्याशिवाय मॉल, सिनेमा हॉल इत्यादी सार्वजनिक ठिकाणे शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.नागपुरात 3796 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आज देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचे 2877 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.

यासह आज महाराष्ट्रातही 12,764 जणांना सुटी देण्यात आली. सध्या 8,13,211 जण घरांमध्ये विलगीकरणात आहेत. तर 7,079 जण रुग्णालयांत दाखल आहेत. राज्यभरात 1,66,353 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान, बीएमसीने ट्वीट करून कोरोनाविरुद्धच्या युद्धात मुंबईकरांना पुन्हा जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि सतत हात धुवा, असे आवाहन बीएमसीने केले आहे.

Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*