महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट.. पण तरीही नाईट कर्फ्यू, लॉकडाऊनसह प्रतिबंधक नियम प्रभावी नसल्याचे केंद्रीय पथकाचे ताशेरे

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेले नियम फारसे प्रभावी ठरताना दिसत नाहीत. राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊनचा देखील फारसा फरक पडत नाही असे ताशेरे केंद्रीय पथकाने आढले आहेत.Corona rules in Maharashtra not effective with night curfew, lockdown: Central team


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेले नियम फारसे प्रभावी ठरताना दिसत नाहीत. राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊनचा देखील फारसा फरक पडत नाही असे ताशेरे केंद्रीय पथकाने आढले आहेत.

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्यामुळे केंद्राकडून संबंधित राज्यांमध्ये पाहणी करण्यासाठी विशेष पथक पाठविण्यात आलं होतं. या पथकानं आपल्या दौऱ्यानंतर एक अहवाल तयार केला असून तो केंद्र सरकारला पाठवला आहे.नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित अहवालातील माहिती दिली आहे. केंद्रीय पथकानं महाराष्ट्रातील विदर्भात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कोरोना संक्रमित घरांची तातडीनं माहिती मिळवणं, कंटेन्मेंट झोनवर जास्त लक्ष ठेवणं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणें या संबंधातील सूचना करण्यात आल्या आहेत.

यासोबतच बस डेपो, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी वेगानं कोरोना चाचण्या कराव्यात आणि रॅपिड अँटिजन टेस्ट किट्सचा वापर केला जावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

यात राज्यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के इतकीच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय राज्यात आता लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे.

अंत्यसंस्कारावेळी केवळ २० जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे. राज्यातील अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवा वगळता इतर सर्व कंपन्यांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थितीला परवानगी असणार आहे.

Corona rules in Maharashtra not effective with night curfew, lockdown: Central team

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*