पंजाबमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता कहर, शाळा, महाविद्यालये झाली बंद


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनामुळे पंजाबमध्ये आता शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय अनेक परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.Corona re-emergence in Punjab schools colleges closed

राज्य सरकारने या अनुषंगाने नवे दिशा निर्देश जारी केले आहेत. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतून लसीकरण करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. दिवसभरात किमान आठ तास तरी लसीकरण होणे गरजेचे आहेअसा आदेश पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी प्रशासनाला दिला आहे. मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज वगळता सर्व शैक्षणिक संस्था या ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. सिनेमागृहांतील प्रेक्षकांची मर्यादा पन्नास टक्क्यांवर आणण्यात आली आहे.

मध्यप्रदेश सरकारने २० मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या सरकारी वाहनांना राज्यबंदी केली असून खासगी वाहनांना मात्र या नियमांतून वगळण्यात आले आहे. अन्य राज्ये देखील निर्बंध आणखी कठोर करू शकतात.

Corona re-emergence in Punjab schools colleges closed

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था