कोरोना काळात देश पुढे कसा न्यायचा?; आजपासून पंतप्रधान मोदींचे ‘जन आंदोलन’

  • हिवाळ्याच्या कालावधीत सतर्कता; सार्वजनिक ठिकाणी फलक

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतच आगामी सण आणि हिवाळा आणि अर्थव्यवस्थेच्या स्थिती लक्षात घेत आणि करोनाबाबात सर्व उपाययोजनांचं पालन करत देश कसा पुढे नेता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ‘जन आंदोलना’ची सुरूवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका ट्वीटद्वारे या मोहिमेची सुरूवात करणार आहेत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “कोरोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि हात धुणे हाच आहे. याचाच वापर करून सार्वजनिक ठिकाणी या उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिमेची सुरूवात करण्यात येणार आहे,” असे जावडेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले. “करोना काळात घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. औषधं आणि लसीशिवाय मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुत राहणे हे कोरोनाविरोधातील कवच आहे. या मोहिमेंअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत.

“हिवाळ्याच्या कालावधीत नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावले जातील. बस स्थानक, विमानतळ यांसारख्या ज्या ज्या ठिकाणी लोक संपर्कात येतात, अशा ठिकाणी हे फलक लावण्यात येणार आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील करोनाबाधितांच्या संख्येनंही आता ६७ लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही आता १ लाखाच्या वर गेली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*