राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, नागरिक धास्तावले ; साडेतीन महिन्यातील उच्चांक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहेत. शुक्रवारी रुग्णसंख्येनं 110 दिवसातील सर्वात मोठा आकडा गाठला आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे नवे 39,726 रुग्ण आढळले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारच्या तुलनेत मृतांच्या संख्येत घट आली आहे. शुक्रवारी 154 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Corona outbreak in the stateयाआधी 29 नोव्हेंबरला देशात 41,810 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर हा आकडा खाली येताच सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येचा आलेख वर जात आहे. त्यामुळे पुन्हा सर्वांचीच चिंता वाढली आहे. शुक्रवारी नवीन रुग्णसंख्येचा आकडा पाहाता लवकरच नोव्हेंबरची हीआकडेवारीही पार होईल, अशी भीती आहे. दरम्यान कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.38 टक्के आहे.

उपराजधानी नागपूरमध्ये संक्रमण वाढले :

राज्यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णसंख्या तीन हजारांच्या पुढे आहे. शुक्रवारी 24 तासात नागपुरात 3235 नवीन रुग्णांची नोंद झालीआहे. 24 तासात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनातून बरे झालेल्या 65 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सहा महिन्यांनंतर संसर्गाची बाधा होण्याचा मोठा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढला आहे.

Corona outbreak in the state

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*