महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांसाठी कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे, संक्रमण वाढीमुळे राज्य सरकारचा निर्णय

corona Negative certificate Mandatory for travelers from Maharashtra Before Entering Karnataka

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळै कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. कर्नाटक सरकारने विमान, बस, ट्रेन किंवा खासगी वाहनांतून राज्यात येणार्‍या लोकांसाठी आरटी-पीसीआर कोविड-19 नकारात्मक प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. हे प्रमाणपत्र 72 तासांपेक्षा जास्त जुने नसावे, असेही म्हटले आहे. corona Negative certificate Mandatory for travelers from Maharashtra Before Entering Karnataka


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळै कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. कर्नाटक सरकारने विमान, बस, ट्रेन किंवा खासगी वाहनांतून राज्यात येणार्‍या लोकांसाठी आरटी-पीसीआर कोविड-19 नकारात्मक प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. हे प्रमाणपत्र 72 तासांपेक्षा जास्त जुने नसावे, असेही म्हटले आहे.

कर्नाटकच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात असे सांगितले की, प्रवासी वाहनात बसताना विमान कंपनीचे कर्मचारी या नकारात्मक अहवालाची खात्री करतील.परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि हॉटेल, रिसॉर्ट्स आणि इतर ठिकाणी थांबलेल्या लोकांना आरटी-पीसीआर तपासणीत नकारात्मक अहवाल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांत कोरोना संसर्गितांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, विदर्भ याबरोबरच मराठवाड्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही यासाठी विशेष खबरदारीचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टीने अनेक ठिकाणी शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली असून विदर्भातही काही ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आला आहे.

corona Negative certificate Mandatory for travelers from Maharashtra Before Entering Karnataka

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी