कोरोना वाढतोय आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री ताडोबाच्या सफरीवर, नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिघडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे सुट्टीवर गेले असून, ते ताडोबाची सफर करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.Corona is on the rise and Mumbai suburban Guardian Minister Tadoba’s visit, Nitesh Rane accuses Aditya Thackeray


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिघडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे सुट्टीवर गेले असून, ते ताडोबाची सफर करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील इतर भागांसोबतच राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मुंबईतील जवळपास नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती आता बिघडू लागली आहे. त्यामुळे मुंबईत नियम अधिक कडक करण्याचे तसेच अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले जात आहेत.मात्र, या काळात मुंबई उपनगरांचे पालक मंत्री असलेले आदित्य ठाकरे मुंबईत नाहीत. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणाले की, राज्यात आणि मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. आज १७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

मात्र हे सारे घडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाच्या सफरीवर असून, ते सुट्टीचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. मग आता मुंबईला वाचणवार कोण?

गेल्या काही दिवसांत मुंबईतील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. धारावीसारख्या भागातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

Corona is on the rise and Mumbai suburban Guardian Minister Tadoba’s visit, Nitesh Rane accuses Aditya Thackeray

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*