कोरोनाने कापली पतंग व्यवसायाची दोरी

  • विक्रीत 50 टक्के घट; पंजाबच्या निर्मात्यांची गोची

विशेष प्रतिनिधी

अमृतसर : मकर संक्रात आणि पतंग उडविणे यांचे अनोखे नाते आहे. परंतु यंदा अमृतसर येथील अनेक पतंग निर्मात्यांवर कोरोनामुळे संकट आले आहे. विक्रीत 50 टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा पतंग हा मांजाने नव्हे तर कोरोनाने कापला आहे. Corona cuts the rope of the kite business

पंजाबच्या अमृतसरमधील पतंग निर्मात्यांनी सांगितले की, त्यांच्या व्यवसायांना कोविड -१ साथीच्या आजाराचा तीव्र फटका बसला आहे.

पतंग निर्माते अमित मेहता म्हणतात, “आमच्या चार पिढ्या पतंग बनवत आहेत. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा विपरीत परिणाम झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. विक्रीत सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली आहे.”

Corona cuts the rope of the kite business

मकर संक्रातीला देशात पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याशिवाय वैयक्तिकरित्या पतंग उडविण्याचा आनंद लुटला जातो. पण, कोरोना संकटामुळे अशा महोत्सवावर संकट आले आहे. परिणामी पतंगाची खरेदी घटल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*