कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राज्ये सरसावली, रात्रीच्या संचारबंदीवर मोठा भर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी नव्याने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये पुढील आदेश येईपर्यंत सार्वजनिक उद्याने आणि पार्क बंद ठेवली जाणार आहेत. Corona cases increasing rapidly in India

तमिळनाडू सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्यामध्ये मिनी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकनेही लशी वाया जाऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे.पंजाबमध्ये आता रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत अनिश्चिात काळासाठी संचारबंदी लागू असेल. नोएडा, गाझियाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी लुधियाना, जालंधर, पतियाळा, मोहाली, अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर आणि कपुरथळा या जिल्ह्यांमध्ये रात्रीचे निर्बंध अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. झारखंडने कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे.’

Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

Corona cases increasing rapidly in India

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती