कोरोनामुळे ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक; 31 मार्चपर्यंत लांबणीवर

वृत्तसंस्था

सोलापूर : दीड वर्षापासून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोरोनामुळे मार्च २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे.Corona breaks 64,000 co-operative elections extension until March 31st

२०१९ मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका पुन्हा-पुन्हा पुढे ढकलल्या होत्या.मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासनाने १६ जानेवारी रोजी निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश रद्द करून निवडणुका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे प्रक्रिया सहकार प्राधिकरणाने सुरू केली आहे.

अशातच राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने २४ फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या टप्प्यावर निवडणुका थांबविल्या आहेत.

Corona breaks 64,000 co-operative elections extension until March 31st

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*