ममता बॅनर्जींना पाठविली रामायणाची प्रत, प्रभू श्रीरामांचा विरोध बंद करण्याचे केले आवाहन


मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि यापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे त्यांनी म्हटलं आहे. copy of the Ramayana sent to Mamata Banerjee, an appeal to stop opposing Lord Rama


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि यापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे त्यांनी म्हटलं आहे.

कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी त्यांना रामायणाची प्रत पाठविली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राम नामाच्या जयघोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं.

प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे. बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येत इतक्या वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत.

copy of the Ramayana sent to Mamata Banerjee, an appeal to stop opposing Lord Rama

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती