लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीवरून झालेला वाद सिरम – भारत बायोटेकने सामंजस्याने मिटविला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्यावरून सिरम आणि भारत बायोटेक कंपन्यांच्या प्रमुखांमध्ये झालेले वाद दोन्ही कंपन्यांनी पुढे येऊन सामंजस्याने मिटविला आहे. आजच्या संकटकाळा लोकांचा जीव वाचविणे अधिक महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत सिरमचे एमडी आदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी वाद मिटविला आहे. दोघांनी संयुक्त पत्रक काढून हे जाहीर केले आहे. Controversy over corona vaccine was settled amicably by Serum-Bharat Biotech

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या प्रमुखांमध्ये झालेल्या वादानंतर आता दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. लस उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्पही दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे.


भारतातील दोन लसींनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वैज्ञानिकांनी पूर्ण केले, पंतप्रधानांनी केले कौतुक


संयुक्त निवेदनात आदर पूनावाला आणि कृष्णा इल्ला म्हणतात, की “भारतातील तसेच जगातील लोकांचे जीव आणि उपजीविकेची साधने वाचविणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे लक्ष्य आहे. लसीमध्ये लोकांचे प्राण वाचवण्याची तसेच अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याची ताकद आहे. आम्ही एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करू.” असा निर्वाळाही अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा इल्ला यांनी दिला आहे.

“जनतेला गुणवत्तेत दर्जेदार, सुरक्षित आणि परिणामकारक लस उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. लसीचे उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत” असेही या दोन्ही प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

अनावश्यक शेरेबाजीतून झाला होता वाद

फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लसी वगळून अन्य लसी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित आहेत’ अशी शेरेबाजी अदर पुनावाला यांनी केली होती. त्याला कृष्णा इल्ला यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत बायोटेकने लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे, असे कृष्णा इल्ला यांनी स्पष्ट केले.

Controversy over corona vaccine was settled amicably by Serum-Bharat Biotech

स्वदेशी बनावटीच्या लसीवर राजकीय शेरेबाजी देखील झाली. त्यानंतर कृष्णा इल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शंकांना साधार आणि सविस्तर प्रत्युतरे दिली. हा वाद अधिक चिघळण्यापूर्वी दोन्ही कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींनी संयुक्त पत्रक काढून मिटविला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*